breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कंगनाचा ‘धाकड’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाने मुंबईतील जुहूमधील एका प्रसिद्ध लाउंजबाहेर धाकडचा पोस्टर लॉंच केला. या चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत कंगना उपस्थित होती. त्यावेळी तिने हे पोस्टर लॉंच केले. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट पुढील वर्षी 8 एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

कंगनाने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरदेखील शेअर केले आहे. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. चित्रपटाबद्दल बोलताना कंगना म्हणाली, ‘धाकड हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट क्रांतीकारी ठरणार आहे.’ त्यामुळे आता धाकड पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button