breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणेराजकारण

‘BHR’ आर्थिक घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरेला अटक

पुणे |महाईन्यूज|

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कांडरे यास अखेर अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले. सोमवारी पुणे पोलिसांच्या प्रकरणातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथून जितेंद्र कांडरे यास बेड्या ठोकल्या. कांडरेच्या अटकेमुळे मोठे मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे.

‘बीएचआर’ आर्थिक घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मागील काही महिन्यापासून राज्यभरात कडक कारवाई केली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाडून 17 जून रोजी धुळे, जळगाव, औरंगाबाद, जामनेर, भुसावळ व अंमळनेर धडक कारवाई करीत भागवत भंगाळे (जळगाव), छगन झालटे, जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भूसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोहार (जामनेर), प्रीतिश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रमोद किसनराव कापसे (अकोला),प्रेम नारायण कागोटा (पुणे) अशा 13 जणांना अटक केली होती. त्यामध्ये जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापतीसह, जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे याचा समावेश होता.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कांडरे हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पुणे पोलिसांनी या प्रकरणात अधिक कडक कारवाई सुरु केल्यापासून कांडरे हा पोलिसांना गुंगारा देत होता. तरीही पोलिस त्याच्या मागावर होते. दरम्यान, कांडरे हा मध्य प्रदेशातील इंदूर येथे असल्याची खबर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास सोमवारी मिळाली. त्यानंतर पथकाने सोमवारी रात्रीच तत्काळ इंदूर गाठले. त्यानंतर हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या कांडरे यास अटक केली. कांडरे यांच्या अटकेमुळे या प्रकरणात सहभागी असलेले मोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

” ‘बीएचआर’ आर्थिक घोटाळा प्रकरणात जितेंद्र कांडरे हा मुख्य सूत्रधार आहे. त्यास सोमवारी रात्री इंदूरमधून अटक केला आहे. त्यास बुधवारी पुण्याला आणून न्यायालयात हजर केले जाईल.”

– भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे पोलिस.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button