ताज्या घडामोडीमुंबई

जितेंद्र आव्हाडांचे फडणवीस यांच्या ट्वीटला सडेतोड उत्तर, म्हणाले…

ठाणे  |  देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करत त्याच्या विरोधात लागोपाठ १४ ट्वीट केले आहेत. या ट्वीट वर राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले की, ‘ते कुठलाही आरोप करतील त्यांना आरोप करायला काय जातंय, ते काही विचारतील त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे अस थोडी आहे’, असे आव्हाड म्हणाले. तसेच मला अडचणीत आणून दोघांमध्ये कुठेतरी भांडण लावायचे काम माध्यमांनी करू नये, दोघांमध्ये भांडण लावण्यासाठी मी माध्यमांना मुलाखती देत नाही, असेही आव्हाड म्हणाले.

३७० बाबत काय म्हणाले आव्हाड

आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अनेक आरोप करत १४ ट्वीट केले आहेत. या आरोपांना उत्तर देताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी केलेल्या आरोपांमध्ये त्यांनी बाबा साहेबांना ३७० चा विरोध होता, असा आरोप केला आहे त्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी जर ३७० ला बाबासाहेबांचा विरोध होता तर ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये आलं कसं हे मला काही समजलं नाही. त्यांनी हिंदू कोड बिल आणायचा प्रयत्न केला आणि त्याचा विरोध झाला. त्या हिंदू कोड बिल मध्ये हे होते की, स्त्रियांना ५० टक्के वाटा द्यावा. तेव्हाच सामाजिक आणि राजकीय वातावरण असं होतं की, पुरुष प्रधान संस्कृतीला महत्त्व दिलं जायचं. त्या वेळच्या भगिनींना त्या राजकीय परिस्थिती आणि त्यावेळच्या राजकीय नेत्यांना एवढा मोठा वाटा देणे योग्य वाटलं नाही. पण तो वाटा देण्यात यावा अस बाबासाहेबांना वाटत होतं. ३७० या कलमावरून वाद झालेला मला तरी असेंबलीच्या चर्चेमध्ये सापडलं नसल्याचे आव्हाडांनी सांगितले.

काश्मीर फाईलवरुन देखील दिलं उत्तर

फडणवीस यांनी काश्मीर फाईलवरून शरद पवार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील केला होता. त्यावर बोलताना आव्हाड यांनी काश्मीर फाईलपेक्षा तुमचं काश्मीरीच्या विकासामध्ये कश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये योगदान किती हे बोलाव ना. हे पिक्चर दाखवून काय होणार आहे. तसेच बारा बॉम्ब स्फोट तेरा बॉम्ब स्फोट हे मला माहीत नाही. ९३ ची आठवण तुम्ही काढू नका. कशाला ९३ च्या आठवण काढताय. नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केली, कोणी पेढे वाटले कोणी गुलाल उधळला, संविधान कोणी नाकारलं तिरंगामध्ये तीन रंग येतात हे वाईट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे जायचं आपण आता २०२२-२३ मध्ये आलोय. उगाच इतिहास खणून त्याच्यातली हाडं, राहिलेलं सगळं बाहेर काढणं हे माझ्या दृष्टीने सर्व चुकीचं आहे काही विषय तिथल्या तिथे बंद करायचे असतात.

इशरत जहा बाबत फडणवीस यांनी आरोप केला आहे की, इशरत जहाला राष्ट्रवादीने मदत केली. यावर आव्हाड म्हणाले की, बोलताना असं कधीही, कोणीही म्हटलेलं नाही. ते कुठलाही आरोप करतील त्यांना आरोप करायला काय जातंय. ते काही विचारतील त्यांच्या प्रत्येक दिलेल्या प्रश्नाला आम्ही उत्तर दिलं पाहिजे असं थोडी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.

जेम्स लेनचा वाद पुन्हा घालायचा नाही

जेम्स लेनच्या मुद्द्यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, जेम्स लेनचा वाद पुन्हा घालायचा नाही. जेव्हा तुम्हाला खरा वाद घालायचा होता. तेव्हा तुम्ही घरात बसले होतात. जेम्स लेनचे पुस्तक महाराष्ट्राच्या बाजारात पहिल्यांदा आमच्या काही मित्रांनी आणलं त्यातील किशोर ढमाले प्रमुख माणूस होता. त्यामुळे मला आता जेम्स लेन या विषयांमध्ये हात घालायचा नाही. राज ठाकरे यांनी पवार आणि माझ्यावरती वैयक्तिक टीका केली मी म्हणून मी बोललो. नाहीतर, मी यापूर्वी कधीही राज ठाकरे यांच्यावर बोललो नाही. राज ठाकरे जे बोलतात ते लोकांना आवडतं. ते मला बोलले मी त्यांना बोललो माझ्यापुरता हा विषय संपला असे आव्हाड यांनी सांगितले.

जातीय राजकारणावर बोलताना आव्हाड यांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकपासून ते अफझलखानाच्या कोतळ्यापर्यंत नंतर पेशवाईचा या सगळ्याचा इतिहास मी सांगितला तुम्ही विसरता का? का तुम्हाला परत आग लावायची आहे. आम्हाला अडचणीत आणून दोघांमध्ये कुठेतरी भांडण लावायचे काम माध्यमाने करू नये. दोघांमध्ये भांडण लावण्याच्या कामासाठी माध्यमांना मुलाखती देत नाही मी अशी संतप्त प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button