breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

JIO च्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ; एयरटेल, वोडाफोन-आयडियाला मोठं नुकसान

नवी दिल्ली | रिलायन्स जीओच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. Jioच्या सक्रिय ग्राहकांच्या संख्येत जुलैमध्ये 25 लाखांची वाढ झाली आहे. याआधीच्या महिन्यात सक्रिय ग्राहकांच्या संख्येत घट झाली होती. जीओच्या प्रतिस्पर्धी कंपन्या भारतीय एयरटेलच्या सक्रिय ग्राहकांच्या संख्येत जुलैमध्ये 4 लाखांची घट झाली आहे. तसंच वोडाफोन-आयडियाचेही 38 लाख सक्रिय ग्राहक कमी झाले आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाकडून (TRAI) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

आकड्यांनुसार, फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा जुलैमध्ये टेलिकॉमच्या एकूण ग्राहकांच्या संख्येत 35 लाखांची वाढ झाली आहे. परंतु यादरम्यान सक्रिय ग्राहकांची संख्या एकूण 21 लाखांनी घटली आहे.सक्रिय ग्राहकांच्या संख्येची गणना व्हिजिटर लोकेशन रजिस्टरद्वारे (वीएलआर) केली जाते. हे मोबाईल नेटवर्कवरील सक्रिय ग्राहकांची संख्या सांगतं. ट्रायनुसार, देशात एकूण वायरलेस कनेक्शची संख्या जुलैमध्ये 114.4 कोटी होती. 2020 मध्ये यापैकी सक्रिय कनेक्शची संख्या 95.58 कोटी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button