TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘द काश्मीर फाईल्स’वरुन जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खडाजंगी

मुंबई | ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून देशात जोरदार चर्चा सुरू असून यावरून अनेक वादही होताना दिसत आहेत. यामध्येच काँग्रेससह इतर विरोधी पक्ष नेत्यांनी संसदेत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता याचे पडसाद राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाले. ‘द काश्मीर फाईल्स’ पाहण्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली.

विधानसभेत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर भाष्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल आम्ही ठरवले होते आणि आम्ही कश्मीर फाइल्स पाहायला गेलो होतो, तुम्हाला काही अडचण आहे का? असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला लगावत म्हटले आहे की, ‘द कश्मीर फाइल्स’ इंटरव्हलनंतर फार कंटाळवाणा सिनेमा आहे. फार इंटरेस्टिंग नाही. कश्मीर फाइल्सचे इतके कौतुक असेल तर 17 कोटींच्या चित्रपटाने 150 कोटी कमावले, तितके पैसे या चित्रपटाच्या निर्मात्याने काश्मिरी पंडितांच्या घर बांधणीसाठी द्यावेत, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button