ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रेड स्वस्तिक सोसायटीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी जनसेवक संतोष बारणे यांची निवड..

पिंपरी | आरोग्यसेवेसह अन्य भरीव सामाजिक सेवेसाठी सुविख्यात असलेल्या भारतातील प्रतिष्ठित रेड स्वस्तिक सोसायटी या संस्थेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी समाजसेवक व कर्तव्यदक्ष रुग्णसेवक संतोष बारणे यांची निवड करण्यात आली आहे.भारतासह संयुक्त राज्य अमेरिका व युनायटेड किंगडम यांसारख्या देशांतही संस्थेने मोलाचे कार्य केले आहे. संपूर्ण भारत देशामध्ये संस्थेच्या असंख्य शाखा क्रियाशील असून त्यामाध्यमातून कॅन्सर शस्त्रक्रिया व रोगनिदान कार्यक्रम, कृत्रिम अंग प्रत्यारोपण , नेत्रतपासणी, हृदयशस्त्रक्रिया इत्यादी विनामूल्य सेवा प्रदान करण्याचे कार्य सातत्याने केल्या जाते.संपूर्ण मानवसेवेसाठी वाहून घेतलेल्या रेड स्वस्तिक सोसायटी या संस्थेने महाराष्ट्र राज्यातील पुणे या अफाट लोकसंख्या असलेल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी पुणे शहरातील मोशी परिसराचे कर्तव्यनिष्ठ जनसेवक व राष्ट्रसेवेसाठी समर्पित युवा समाजसेवक संतोष बारणे यांची निवड केली आहे.

संतोष बारणे यांनी आजवर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रुग्णसेवेचे, युवक कल्याणाचे, क्रीडा विकासाचे, रक्तदानाचे, महिला सशक्तीकरणाचे, सामाजिक न्यायाचे, निसर्गोपचार व योगशास्त्र सेवेचे, रोजगार निर्मणाचे व एकूणच समाजसेवेचे अनन्यसाधारण कार्य केले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात स्वतः दिवसरात्र झटून लोकांच्या आरोग्य रक्षणार्थ संतोष बारणे यांनी प्रत्यक्ष कोरोना-योद्धा बनून लोकांना कमालीचे मदतकार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने ‘STAR 2020’ या सन्मानाने त्यांना गौरविले आहे. रेड स्वस्तिक सोसायटीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संपूर्ण देशपातळीवर सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button