breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जय गणेश साम्राज्य चौक घेणार ‘मोकळा श्वास’

चऱ्होलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला गती

आमदार महेश लांडगे, महापालिका प्रशासन सकारात्मक
पिंपरी । प्रतिनिधी
पुणे- नाशिक महामार्गावरील अत्यंत वर्दळीचा असलेल्या जय गणेश सम्राज्य चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून, चऱ्होलीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक आणि नागरिकांची या ठिकाणी होणाऱ्या ‘कोंडी’तून मुक्तता होणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी याबाबत पाठपुरावा सुरू केला असून, विकास आराखड्यातील मंजुरीप्रमाणे रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी सूचना प्रशासन आणि प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी यांना केली आहे. याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण जय गणेश साम्राज्य चौकात मोठ्या प्रमाणात जाणवतो. स्पाईन रोडहून चऱ्होलीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही प्रचंड आहे. मात्र, चौकातून चऱ्होलीकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी सिग्नल लागल्यास चाकण आणि भोसरी अशा दोन्ही बाजुच्या दिशने किमान एक-दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. ‘पीक अवर’मध्ये वाहनचालक, नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चऱ्होलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकास आराखड्यातील मंजुरीप्रमाणे रुंदीकरण करण्यात येणार आहे. ‘डीपी’नुसार हा रस्ता ४५ मीटर असून, सध्यस्थितीला केवळ ६ मीटर इतका उपलब्ध आहे. प्रशासनाला १८ मीटर रस्त्यापर्यंत भूसंपादन करण्यात यश मिळाले असून, तुर्तास पहिल्या टप्प्यामध्ये १८ मीटर रस्त्याचे काम प्राधान्यक्रमाने सुरू करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.
महापालिका सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे म्हणाले की, नगर रचना विभागाने स्पाईन रोडहून चऱ्होलीकडे जाणाऱ्या रस्त्याचे १८ मीटर रुंदीकरण करण्याबाबत सीमांकन केले आहे. त्याची पूर्तता बीआरटी विभागाकडे केल्यास आयुक्तांच्या मान्यतेने सदर काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे जय गणेश सम्राज्य चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.
**
प्रतिक्रिया :
स्पाईन रोडहून चऱ्होलीकडे जाणारा रस्ता ‘डीपी’ मध्ये ४५ मीटर आहे. मात्र, प्रशासनाकडे अद्याप १८ मीटरपर्यंत जागेचा ताबा आहे. सध्यस्थितीला सदर रस्ता केवळ ६ मीटर असून, अरुंद रस्ता आणि वाहनांची मोठी संख्या यामुळे जय गणेश साम्राज्य चौकात कोंडी होत आहे. त्यामुळे उपलब्ध भूसंपादनाप्रमाणे १८ मीटरपर्यंत रुंदीच्या रस्त्यांचे काम मार्गी लागल्यास वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button