breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…भविष्याशी खेळणं योग्य नाही,” परीक्षा गोंधळावरुन रोहित पवारांचा संताप; सरकारला घरचा आहेर

मुंबई |

आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील संताप व्यक्त केला असून सरकारला घरचा आहेर दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट केलं असून परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही असं म्हटलं आहे. तसंच येत्या काळात सर्व परीक्षा एमपीएससीमार्फतच घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे. “एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिलोकेट करावेत,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

“तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा,” अशी मागणीही मांडली आहे. “उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती,” असल्याचं ते म्हणाले आहेत.

आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित ‘न्यासा’ कंपनीच्या कामाबाबत नाराजी प्रकट के ली होती. त्यानंतरही याच कं पनीद्वारे २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले.

त्यानुसार २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर नियोजनात झालेला नवा गोंधळ लक्षात येऊन उमेदवार चक्रावून गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी दोन पदांसाठी अर्ज केला असल्याने संबंधित विद्यार्थ्यांला एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा देणे शक्य असताना दोन सत्रांतील परीक्षासाठी दोन वेगळ्या जिल्ह्य़ांतील परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे दोन परीक्षांसाठीचे शुल्क भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षेत गोंधळ झाला असल्यास प्रशासनाने बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करावी, अशी परखड भूमिका माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी समाजमाध्यमांद्वारे मांडली आहे.

नामुष्कीचा इतिहास…

  • ’आरोग्य विभागाकडून गट क आणि गट डमधील पदांची भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांद्वारे राबवण्यात येत आहे.
  • ’या प्रक्रियेसाठी निवडलेली ‘न्यासा’ कंपनी काळ्या यादीतील असल्याचा आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.
  • ’मात्र त्यावेळी परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्रांबाबत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली होती.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button