breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“राज्यपालांनी इतका अभ्यास करणं बरं नाही, अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे,” खासदार संजय राऊतांचा टोला

मुंबई |

विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या किंवा आवाजी मतदानाने घेण्याच्या नियमबदलाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतला आहे. राज्यपालांच्या या पवित्र्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक संकटात सापडली आह़े. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी प्रतिक्रिया दिली असून राज्यपालांना इतका अभ्यास बरा नाही असा टोला लगावला आहे. “आपले राज्यपाल आपले फार अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही. हे अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे. एकतर मुळात लॉकडाउनमध्ये अभ्यास कमी झाला आहे, त्यात तुम्ही असा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करु लागलात. घटनेत काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या असून त्यानुसार तुम्हााल काम करायचं आहे. घटनेत मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात असं लिहिलं असून हे बंधनकारक आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीचं अद्याप काही झालेलं नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“राज्यपालांचं ‘शांतता अभ्यास सुरु आहे’ असं नवं नाट्य राज्यभवनात सुरु आहे. त्यात भाजपाचे प्रमुख लोकंही सहभागी आहेत. थोडं दिवस हे नाट्य सुरु राहील. अशाप्रकारची पथनाट्य सुरु असतात,” असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. “या देशातील श्रमिक, शेतकरी, उद्योजक यांच्यामुळे हा देश बलाढ्य झाला आहे. पण आता आम्हाला भाजपाला देणगी दिल्याने देश बलाढ्य होईल हे नव्याने कळालं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जी गोष्ट सांगितली आहे त्यावरुन लोकांच्या मनात संभ्रम आहे. राजकीय पक्ष देणगी गोळा करु शकतो, पण पंतप्रधान देणगी देण्यासाठी आवाहन करत असतील तर तर मग हा नैतिकतेचा भंग आहे. भाजपाध्यक्ष नड्डा किंवा महासचिव असं आवाहन करु शकतात. पण पंतप्रधानं, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांनी माझ्या पक्षाला देणगी देण्यासाठी आवाहन करणं योग्य नाही. संपूर्ण जगात असं कोणी सांगत नाही, पण आपले पंतप्रधान करत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले.

“देणग्या आम्हालाच द्या दुसऱ्याला देऊ नका हा स्पष्ट संदेश आहे. देशातील जनतेकडून घेणं हा बहाणा असून हा उद्योगपतींना दिलेला संदेश दिसत आहे. भाजपाचं बँक खातं पाहिलं तर त्यात शेकडो कोटी जमा झाले आहेत. टाटांपासून सर्वांनीच त्यांनी देणगी दिली आहे. त्यात हरकत घेण्यासारखं काही नाही. देणगी देण्यात काही चुकीचं नाही, पण पंतप्रधानांनी अशाप्रकारे समोरुन देणगी देण्यास सांगण्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधानांनी फक्त राष्ट्राविषयी बोललं पाहिजे पण ते दुर्दैवाने बोलत नाहीत अशी टीकाही यावेली संजय राऊतांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button