breaking-newsआंतरराष्टीय

ISI साठी हेरगिरी, १८ वर्षांत १७ वेळा गेला पाकिस्तानमध्ये

पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मद परवेझला (वय ४२) राजस्थान पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.  मोहम्मद परवेझ हा पैशांपायी आयएसआयसाठी हेरगिरी करत होता, अशी माहिती समोर आली आहे.

मोहम्मद परवेझ हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. देशविरोधी कारवायाप्रकरणी एनआयएने २०१७ साली त्याला अटक केली होती. सोमवारी राजस्थान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्याला अटक केली. परवेझ हा १८ वर्षांमध्ये तब्बल १७ वेळा पाकिस्तानमध्ये गेला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. परवेझ हा भारतीय सैन्यातील जवानांना हनी ट्रॅपमध्ये अडकवायचा. बोगस नावांच्या आधारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवायचा. ही माहिती तो आयएसआयला पुरवायचा. या मोबदल्यात आयएसआयकडून परवेझला पैसे मिळायचे, अशी माहितीही तपासातून समोर आली आहे.

परवेझ हा नियमितपणे पाकमधील आयएसआय एजंटच्या संपर्कात होता. परवेझ हा दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासात व्हिसासाठी येणाऱ्या लोकांकडून कागदपत्रे मिळवायचा. व्हिसाचे काम करुन देतो, असे सांगत तो ही कागदपत्रे मिळवायचा आणि या आधारेच त्याने सिम कार्ड खरेदी केले होते. या सिम कार्डचा वापर तो पाकिस्तानमधील आयएसआय एजंटशी संपर्क साधण्यासाठी करायचा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button