ताज्या घडामोडीमुंबई

शिवसेना भवन म्हणजे मशिद आहे का; भोंग्यांवरील कारवाईनंतर मनसेचा सवाल

मुंबई|मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकारण तापलं आहे. मनसेनं राज्यातील विविध भागात मंदिरात हनुमान चालीला लावत आंदोलन केलं आहे. तर, आज मनसेनं शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण करत शिवसेनेला डिवचलं आहे. पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली आहे.

मुंबईतील दादर परिसरात असलेल्या शिवसेना भवनासमोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाउडस्पीकरवर हनुमान चालीसाचे पठण केले. तसंच, तिथे रामनवमीचे पोस्टरही झळकावले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर लाउडस्पीकर जप्त केले आहेत. त्याचबरोबर, मनसेचे नेते यशवंत किल्लेकार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे असून पोलिस स्थानकात नेण्यात आलं आहे.

शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का?, असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button