breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#IPL2021 आज मुंबई पहिल्या विजयाच्या शोधात; कोलकाताविरुद्ध लढत

चेन्नई – आयपीएल २०२१मध्ये आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता विरुद्ध मुंबई सामना रंगणार आहे. मुंबईचा संघ यंदाच्या मौसमातील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. तर केकेआरने आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे केकेआरची नजर दुसरा विजय मिळून गुणतक्तात अव्वल स्थानी झेप घेण्याची असेल.

दरम्यान, आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघात २७ लढती झाल्या असून त्यात मुंबईने २१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे आज कोलकाता मुंबईवर भारी पडणार का की अपयशी ठरणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईचा स्टार ओपनर डी कॉक आजच्या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. डी कॉक 7 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकाहून भारतात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार, डी कॉकला सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागलं होतं. 13 एप्रिलला डी कॉकचा क्वॉरंटाईनचा अवधी संपत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कोलकातासोबतच्या सामन्यात डी कॉक ओपनर बॅट्समन म्हणून मैदानावर उतरु शकतो. डी कॉकच्या अनुपस्थितीत आरसीबी विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत क्रिस लिन ओपनर म्हणून मैदानावर उतरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button