breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

आजपासून आयपीएलचा थरार! मुंबई इंडियन्सvsरॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु सलामीची लढत

चेन्नई – इंडियन प्रीमियर लिग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या मोसमाचा थरार आजपासून म्हणजेच 9 एप्रिलपासून रंगणार आहे. सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स  विरुद्ध विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर खेळविण्यात येणार आहे. लागोपाठ दोन वेळा मुंबईने आयपीएलचा करंडक आपल्या नावे केला आहे. त्यामुळे आता या मौसमात विजयी सलामी देऊन स्पर्धेची सुरुवात थाटात करण्यास रोहितची ब्लू आर्मी सज्ज आहे. तर दुसरीकडे आक्रमक खेळाडू्ंनी भरलेला बंगळुरुचा संघ मुंबईला नमवून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यायला तयार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14व्या पर्वातील सलामीचा सामना भारतीय वेळेनुसार सामना आज ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याची नाणेफेक होईल. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळेल. तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी + हॉटस्टारवरही पाहू शकता.

कसा आहे रोहितचा मुंबई इंडियन्स संघ?
मुंबईच्या संघात अनुभवी आणि विस्फोटक खेळाडूंची कमी नाही. मुंबईचे सलामीवार कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक सुरुवातीच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघांवर हल्लाबोल करण्यास नेहमीच सज्ज असतात. तसेच सलामीचा फलंदाज म्हणून मुंबईकडे क्रिस लिनचादेखील पर्याय असणार आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला रोखायचे मोठे आव्हान आज बंगळुरुसमोर असेल. तसेच पांड्या ब्रदर्सदेखील ऐन फॉर्मात आहेत आणि पोलार्ड तर सज्ज आहेच. एकूणच मुंबईची बॅटिंग लाईनअप तगडी आहे.

तर दुसरीकडे गोलंदाजीबाबतही मुंबईचा संघ आघाडीवर आहे. यॉर्ककर किंग जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट यांच्यासारखे दोन जागतिक दर्जाचे गोलंदाज मुंबईजवळ आहेत जे कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात आणि कुल्टर नाईलचाही मुंबईच्या संघात समावेश आहे. तसेच अनुभवी पीयुष चावला आणि राहुल चाहरच्या फिरकीने मुंबईच्या फलंदाजीला एक वेगळीच धार चढली आहे.

कसा आहे विराटचा रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संघ?
प्रत्येक आयपीएलच्या हंगामात जसा बंगळुरुचा संघ खतरनाक वाटतो तसाच यंदाच्या हंगामातदेखील विस्फोटक वाटतोय. बंगळुरुकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्यासोबत देवदत्त पडीक्कलच्या रुपाने आक्रमक सलामी जोडी आहे, जी जगातल्या क्लास गोलंदाजांचा समाचार घेण्यास सज्ज आहे. तर ए बी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे हिटर या संघात आहेत, जे जगातल्या कोणत्याही गोलंदाजाचा चेंडू स्टेडियमबाहेर पटकावण्यास सक्षम आहेत. तसेच न्यूझीलंडच्या फीन एलेनचादेखील संघात समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रजत पाटीदार, मोहम्मद, काइल जमैसिन आणि क्रिस्टियनच्या रुपाने चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा बंगळुरु संघात आहे. तर गोलंदाजीमध्ये केन रिचर्डसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, ऍडम झॅम्पा यांसारखे टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट गोलंदाज बंगळुरुच्या संघात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button