क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

IPL 2022 : स्टम्प्सच्या पाठीमागून धोनीचा इशारा, जाडेजाने लगेच DRS घेतला पण यावेळी मात्र गडबड झाली!

 

मुंबई  | एविन लुईसच्या  वादळी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या मोसमातला चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव होता. मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चेन्नई आणि लखनौ सुपर जायंट्स  यांच्यातील सामन्यात लखनौने सहा विकेट्सने चेन्नईला पराभूत केलं. लखनौ संघाने तब्बल २१० धावांचा पाठलाग केला. जाडेजाने  कर्णधारपद हाती घेतल्यानंतर चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. डीआरएसचा नेटकेपणाने वापर करावा तर तो एम. एस. धोनीने,असं म्हटलं जातं. पण कालच्या सामन्यात धोनीची जादू काही चालली नाही.

लखनौच्या डावाच्या 17 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एविन लुईसविरुद्ध कॉट बिहाइंडचं जोरदार अपील झालं. वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसची स्लो डिलीव्हरी लुईसला कव्हर्सच्या दिशेने खेळायची होती, पण तो पूर्णपणे फसला.

बॉल बॅटला लागून आपल्यापर्यंत आल्याचा, धोनीला विश्वास होता. त्याने क्षणाचीही वाट न पाहता, जोरदार अपील केले. अंपायर रिपॉन्स करत नाहीत हे पाहून त्याने कर्णधार रवींद्र जडेजाला रिव्ह्यू घेण्याचा इशारा दिला. जड्डूने लगेच घेतला. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये बॅट जमिनीवर आदळल्याचे स्पष्टपणे दिसत होतं. म्हणजेच बॅट जमिनीवर आदळल्याचा आवाज एमएस धोनीपर्यंत पोहोचलेला असावा. मैदानावरील पंचाचा निर्णय कायम राहिला आणि एविन लुईस थोडक्यात बचावला.

आतापर्यंत धोनीने अनेक वेळा सिद्ध केलं आहे की डीआरएसबाबत त्याचा हात कुणीही धरु शकत नाही. अगदी   क्रिकेट विश्लेषक आणि चाहते धोनी रिव्ह्यू सिस्टम देखील म्हणतात. आतापर्यंत धोनीने घेतेलेले DRS सर्वांत जास्त अचूक ठरले आहेत, तशी आकडेवारी सांगते. विराट कोहली कर्णधार असताना देखील धोनीचा सल्ला घेऊन डीआरएस घेतला जात असे, असं अनेक वेळा दिसलं

पण लखनौविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात धोनीचा DRS बद्दलचा अंदाज चुकला आणि चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तत्पूर्वी
टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये सात गडी गमावून 210 रन्स केले. सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पाने २७ बॉलमध्ये ५० रन्स ठोकले. उथप्पाला शिवम दुबेने सुंदर साध दिली. त्याने 49 धावा केल्या. मोईन अलीने 35 आणि अंबाती रायडूने 27 रन्सचं योगदान दिलं.

प्रत्युत्तरात एविन लुईसच्या तडाखेबाज 55 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने 19.3 ओव्हरमध्ये 4 बाद 211 धावा करुन सामना जिंकला. लुईसशिवाय विकेट कीपर बॅट्समन क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ६१ आणि कर्णधार केएल राहुलने ४० रन्सचं योगदान दिलं. चेन्नई सुपर किंग्जकडून ड्वेन प्रिटोरियसने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button