breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2022: आयपीएलवर पुन्हा कोरोनाचा सावट! पुढचा हंगाम श्रीलंका किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल पुढील हंगाम दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत खेळला जाऊ शकतो. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर, आयपीएल 2022 दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत हलवण्याचा बीसीसीआय विचार करीत आहे. यापूर्वीही भारतातील निवडणुकांमुळं 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेत टी-20 लीगचं आयोजन करण्यात आलं होतं.

आयपीएल 2022 चे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केल्यास सामन्यांच्या वेळेतही बदल होईल. युएईमध्ये संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून सर्वाधिक सामने खेळले गेले. तर, डबल-हेडर सामने दुपारी 3:30 वाजता सुरू झाले. परंतु दक्षिण आफ्रिकेत ही वेळ बदलेल आणि सामना दुपारी चार वाजल्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या बीसीसीआयकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्याचं चित्र येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होऊ शकते.

आयपीएलचा पुढील हंगाम प्रेक्षकांसाठी आणखी खास ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसणार आहेत. लखनौ आणि अहमदाबादचे संघ आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. आयपीएल पहिला हंगाम खूपच रोमांचक होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकांचे मन जिंकले. एवढंच नव्हेतर यातील अनेक खेळाडूंची भारती क्रिकेट संघातही निवड झालीय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 2020चं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं. त्यानंतर आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात खेळवण्यात आला. परंतु, कोरोना प्रसार वाढू लागल्यानं आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवण्यात आले. मात्र, यावेळी बीसीसीआय आयपीएलचा पुढचा हंगाम दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेत खेळवण्याचा विचार करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button