breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2021: शेवटच्या चेंडूवर षटकार; RCB चा दिल्लीवर थरारक विजय

IPL 2021 DC vs RCB– दिल्लीविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात RCBच्या केएस भरतने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीने २० षटकात १६४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. त्यावेळी आवेश खानच्या गोलंदाजीवर RCBच्या केएस भरतने उत्तुंग असा षटकार लगावत सामना जिंकला.

सामना ‘असा’ रंगला…

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनी दिल्लीला दमदार सुरुवात मिळवून दिली. पृथ्वीने ४८ धावा केल्या तर शिखर धवन ४३ धावा काढून बाद झाला. या दोघांचीही अर्धशतके हुकल्यानंतर ऋषभ पंत (१०) आणि श्रेयस अय्यर (१८) स्वस्तात बाद झाले. अखेर शिमरॉन हेटमायरच्या २९ धावांच्या खेळी दिल्लीने १६०पार मजल मारली. मोहम्मद सिराजने २ तर चहल, पटेल आणि ख्रिश्चनने १-१ बळी टिपला.

या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडीकल शून्यावर तर विराट कोहली ४ धावांवर बाद झाला. एबी डिव्हिलियर्सने चांगली सुरूवात केली होती. पण तो देखील २६ चेंडूत २६ धावांवर बाद झाला. पण श्रीकर भरतने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. त्याला ग्लेन मॅक्सवेलनेही चांगली साथ देत अर्धशतक केले. या दोघांनी शतकी भागीदारी केली. सामना शेवटच्या षटकात पोहोचला असताना संघाला ६ चेंडूत १५ धावा हव्या होत्या. मॅक्सवेलने पहिल्या चेंडूवर चौकार मारला पण पुढील ४ चेंडूवर दोघांनाही मोठा फटका मारता आला नाही. एका चेंडूत ६ धावा हव्या असताना आवेश खानने वाईड चेंडू टाकला. त्यानंतर १ चेंडूत ५ धावांची गरज असताना भरतने षटकार मारून सामना जिंकला. भरतने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३३ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button