breaking-newsक्रिडा

IPL 2018 : मुंबईचा पंजाबवर धमाकेदार विजय

  • संक्षिप्त धावफलक

किंग्ज इलेव्हन पंजाब- 20 षटकांत 6 बाद 174 (ख्रिस गेल 50, स्टॉईनिस नाबाद 29, लोकेश राहुल 24, करुण नायर 23, बुमराह 19-1, मार्कंडे 29-1). पराभुत विरुद्ध मुंबई इंडियन्स 19 षटकात 4 बाद 176 (सुर्यकुमार यादव 57, इशान किशन 25, रोहित शर्मा नाबद 24, कृनाल पांड्या नाबाद 31)

इंदूर – रोहित शर्मा आणि कृणाल पांड्याने अखेरच्या 18 चेंडूंमध्ये 51 धावा फटकावत पंजाबने दिलेल्या 175 धावांचे आव्हान 19व्या षटकांत 4 बाद 176 धावा करत धमाकेदार विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर मजल मारली.

नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात संथ झाली, सलामीवीर एविन लुईस आणि सूर्यकुमार यादवने 5.4 षटकात 38 धावांची भागीदारी केली. यावेळी लुईसने केवळ 10 धावा केल्या. त्यानंतर ईशान किशन सोबत सूर्यकुमारने 6 षटकांत 42 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारला बाराव्या षटकात मार्कस स्टॉईनिसने बाद केले. त्याने 42 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत 23 धावा केल्या. ऍण्ड्रयू टायने पांड्याचा त्रिफळा उडवत मुंबईला चौथा धक्का दिला. त्यानंतर उतरलेल्या कृणाल पांड्या आणि रोहित शर्माने फटकेबाजी करताना मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी रोहितने नाबाद 24 धावा तर कृणालने नाबाद 31 धावा फटकावल्या.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी दिलेली वेगवान सलामी आणि मार्कस स्टॉईनिसची झंझावाती खेळीमुळे मुंबई समोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी लोकेश राहुलने 20 चेंडूंत 24 धावा करताना ख्रिस गेलच्या साथीत पंजाबला 6.4 षटकांत 54 धावांची सलामी दिली. मार्कंडेने राहुलला बाद केल्यावर ख्रिस गेलने 40 चेंडूत 50 धावा फटकावताना युवराजच्या साथीत 5 षटकांत 34 धावांची भर घातली. युवराजही केवळ 14 धावा करून धावबाद झाला.

त्यानंतर करुण नायरने 23 धावांची वेगवान खेळी करताना अक्षर पटेलच्या (13) साथीत 3.3 षटकांत 36 धावांची भर घातली. परंतु हे दोघेही लागोपाठ परतले. अंतिम षटकांमध्ये स्टॉईनिसने 15 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 29 धावा फटकावल्यामुळेच पंजाबला 174 धावांची मजल मारता आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button