breaking-newsक्रिडा

IPL 2018 : गेलमुळे माझ्या फलंदाजीत सुधारणा – राहुल

फॉर्ममध्ये असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबत फलंदाजी करीत असल्याने माझ्या फलंदाजीत सुधारणा झाल्याचे किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलचे मत आहे. विरोधकांचे लक्ष्य गेल असतो. यामुळे मला क्रिझवर स्थिरावण्यास वेळ मिळतो. गेलकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तो सतत हसत राहतो व दुसऱ्यांचे मनोरंजन करतो. टी-20 तील सर्वाधिक धोकादायक असलेल्या फलंदाजासोबत खेळताना मला भरपूर काही शिकायला मिळते, असे राहुलने सांगितले.

राहुलने मोसमातील सात सामन्यात 268 धावा ठोकल्या आहेत. याआधी आम्ही दोघे आरसीबीसाठी एकत्र खेळल्याची माहितीही राहुलने यावेळी दिली. गेलच्या आक्रमक फटकेबाजीचा प्रभाव तुझ्या फलंदाजीवर पडला आहे काय, असे विचारल्यावर राहुल म्हणाला, “आम्ही एकमेकांना चांगले समजलो आहे. खेळाचा आनंद कसा लुटायचा हे गेलकडून शिकण्यासारखे आहे. दडपणातही प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सोपे नाही. गेल मात्र याला अपवाद आहे. म्हणूनच प्रतिस्पर्धी संघ त्याच्याविरुद्ध सारखा दडपणाखाली असतो.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button