breaking-newsक्रिडा

IPl 2018 : हैदराबादसमोर आज दिल्लीचे आव्हान

हैदराबाद – आयपीएलच्या अकराव्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी बजावून गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या सनरायजर्स हैदराबादसमोर आज होणाऱ्या लढतीत गुणवान खेळाडू असूनही अपेक्षित कामगिरीच्या अभावी सहाव्या स्थानी असलेल्या दिल्लीचे आव्हान आहे. आयपीएलच्या चालू हंगामात पहिल्या सामन्यापासून अडचणीत असलेल्या दिल्लीच्या संघाकडे श्रेयस अय्यर, गौतम गंभीर, ऋषभ पंत, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ सारखे चांगले फलंदाज तर अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल टवेटीया, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट यांसारखे चांगले गोलंदाज असूनही त्यांना मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती.

गंभीरने कर्णधारपद सोडल्यानंतर अय्यरने संघाच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले त्यामुळे सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीला बाद फेरीत स्थान मिळवायचे असल्यास त्यांना यानंतरचा प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. तर दुसरीकडे चालू हंगामात हैदराबादने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर आठपैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून अव्वल स्थान गाठले आहे. त्यांच्याकडे केन विल्यम्सन, शिखर धवन, मनीष पांडे, वृद्धिमान साहा यांसारखे चांगले फलंदाज असून भुवनेश्‍वर कुमार, संदीप शर्मा, रशीद खान, शकिब अल हसन, मोहम्मद नबी अशा उत्कृष्ट गोलंदाजांची फळीही आहे. त्यामुळे ते आपल्या प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत असून उद्याच्या सामन्यात दिल्लीपेक्षा हैदराबादचेच पारडे जड दिसत आहे.

प्रतिस्पर्धी संघ- 
सनरायजर्स हैदराबाद- केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्‍वर कुमार, वृद्धिमान सहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी. नटराजन, सचिन बेबी, विपुल शर्मा, मेहंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्‍स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.

दिल्ली डेअरडेव्हिल्स – गौतम गंभीर (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरिस, ग्लेन मॅक्‍सवेल, कगिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाज नदीम, विजय शंकर, राहुल तवेतिया, मोहम्मद शमी, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन मन्‍रो, डॅनिअल ख्रिस्तियन, जेसन रॉय, नमन ओझा, पृथ्वी शॉ, गुरकीरतसिंग मान, आवेश खान, अभिषेक शर्मा, जयंत यादव, हर्षल पटेल, मनजोत कालरा, संदीप लामिचाने, सायन घोष.
सामन्याची वेळ- रात्री 8 पासून. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button