breaking-newsक्रिडा

IPL 2018 : कोलकाताचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय

कोलकाता – शुभमन गिल आणि दिनेश कार्तिक यांच्या झंझावाती भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 14 चेंडू व 6 गडी राखून पराभव करताना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली. या विजयामुळे कोलकाताने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली, तर चेन्नईची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.

कोलकाताने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी पाचारण केल्यावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 177 धावांची मजल मारली. कोलकाताने 17.4 षटकांत 4 बाद 180 धावा फटकावून एकतर्फी विजयाची नोंद केली.

विजयासाठी 178 धावांच्या आव्हानासमोर सुनील नारायणने 20 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 32 धावा फटकावून कोलकाताला वेगवान प्रारंभ करून दिला. मात्र लिन (12), उथप्पा (0) आणि रिंकू सिंग (16) अपयशी ठरल्याने त्यांची 4 बाद 97 अशी घसरगुंडी उडाली होती. अशा वेळी शुभमनने 36 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 57 धावा फटकावताना दिनेश कार्तिकसह 6 षटकांत 83 धावांची अखंडित भागीदारी करीत कोलकाताचा विजय साकार केला. कार्तिकने केवळ 18 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 45 धावा फटकावल्या.

त्यापूर्वी फाफ डु प्लेसिसने 15 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 27 धावा फटकावताना वॉटसनच्या साथीत केवळ 5.1 षटकांत चेन्नईला 48 धावांची सलामी दिली. वॉटसनने 25 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 36 धावा करताना सुरेश रैनाच्या साथीत 5.1 षटकांत 43 धावांची भर घातली. रैनाने 26 चेंडूंत 4 चौकारांसह 31 धावा केल्या. केवळ 17 चेंडूंत 3 चौकारांसह 21 धावा करणाऱ्या अंबाती रायुडूला बाद करून सुनील नारायणने चेन्नईला हादरा दिला. मात्र धोनीने जडेजाच्या (12) साथीत केवळ 5.1 षटकांत 55 धावांची भागीदारी करताना चेन्नईला 178 धावांची मजल मारून दिली. धोनीने 25 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button