breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाशिक दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा – दीपक कविटकर

  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषद करणार पाठपुरावा

पिंपरी / महाईन्यूज

राज्यभर कोरोनाची लाट तीव्र झाली असताना महाराष्ट्रात प्राणवायूच्या गळतीने तब्बल 24 जणांचा बळी गेल्याची घटना घडली. हा काळा दिवस म्हणावा लागेल, या प्रकरणाची सखोल चौकशी करून कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर शासन करावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय सचिव दीपक कविटकर यांनी केली आहे.

सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात वैद्यकीय विभाग अहोरात्र मेहनत घेत आहे. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. याच बरोबर आता रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा जीव गुदमरत आहे. अशा परिस्थितीत नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन भरत असताना पाइप लीकेज झाला आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती झाली. यामुळे 24 जणांचा बळी गेला. ही दुर्दैवी घटना असली तरी या घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे. ऑक्सिजन टाकीची गळती कशी झाली या रुग्णालयाच्या संबंधित यंत्रणेचे ऑडिट झाले आहे का? ऑक्सिजन मधील साठवण यंत्रणा ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा व ऑक्सिजनची संबंधित सर्व बाबी तसेच या पाईपलाईनची देखभाल दुरुस्ती केली जात आहे का? याची नाशिक महानगरपालिकेने चौकशी करून संबंधित अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करावा, अशी मागणीही कविटकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button