पिंपरी / चिंचवड

गुन्ह्यासंदर्भात चौकशी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ

पिंपरी | प्रतिनिधी

गुन्ह्यासंदर्भात चौकशी करत असलेल्या पोलिसांना आई आणि मुलाने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी ओटा स्कीम, निगडी येथे घडली.

नरेश ऊर्फ प्रांजल सुनील घनवट (वय 27) आणि त्याची आई (वय 50, दोघही रा. संतु बहुले चाळ, ओटा स्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी नरेश याला अटक केली आहे. पोलीस कर्मचारी अमर काळुराम जाधव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास फिर्यादी अमर जाधव हे ओटास्कीम, निगडी येथे आरोपी घनवट यांच्याकडे शिवाजी बाबुराव वाघमारे यांचा मोबाईल फोन मारहाण करून हिसकावल्या प्रकरणी चौकशी करीत होते. याचा राग मनात धरून आरोपी नरेश आणि त्याच्या आईने पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी करत धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी पोलीस कर्मचारी अमर जाधव यांची कॉलर पकडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button