breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापना

रायगड | जिल्हा प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून सुवर्ण गणेश मंदिरात सुवर्ण गणेश मुखवटा प्रतिष्ठापनेचा सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सुवर्ण गणेशाची पूजा करण्याचा मान पवार दाम्पत्याला मिळाला.

अजित पवार म्हणाले की, अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर आज हा सुवर्ण दिन आपल्या सर्वांना पाहायला मिळतआहे. महाराष्ट्राच्या दृष्टीनं कोकण आणि कोकणवासियांचा विकास अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीनं विविध योजनांच्या माध्यमातून कोकणचा विकास साध्य करण्यासाठी हे शासन सदैव प्रयत्नशील आहे.

या महाराष्ट्रानं अनेक संकटं पाहिली, अनेक संकटं झेलली. परंतु हा महाराष्ट्र कधी थांबला नाही. यापुढेही हा महाराष्ट्र निर्धारानं, एकजुटीनं प्रत्येक संकटावर मात करून पुढे जात राहील, असे प्रतिपादन कार्यक्रमात केले.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1463133838347964416?t=aM9BWMx4HWTuy2krp3VPgA&s=19

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button