TOP Newsगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची प्रतिष्ठापना

राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. घराघरात गणपती बाप्पांचं भक्तीभावाने आगमन होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

“राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील गणेश भक्तांना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

“यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत”

एकनाथ शिंदे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून कायम असणारं करोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “आज श्री गणेश चतुर्थी. सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button