ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये औषध विक्रेत्यांना सीसीटीव्ही लावणे ‘अनिवार्य’

नाशिक | गंगाथरन डी. यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेच नाशिकमधील औषध विक्रेत्यांना एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही लावणे अनिवार्य केले आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुलांमधील अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात अशा अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाई प्रभावीपणे राबवली जाईल, अशी तंबीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मालेगावपर्यंत ड्रग्ज विक्रीचे धागेदोरे जोडले गेल्याचे समोर आले होते. नाशिकमधील अनेक भागातही सर्रास ड्रग्ज विक्री होते. तरुण मुलांना या व्यसनाच्या जाळ्यात ओढले जाते. अनेक विद्यार्थी औषधे, गोळ्या, व्हाइटनरची नशा करतात. त्यामुळे ऐन तारुण्यात ते वाममार्गाकडे वळतात. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, शेड्युल एक्स (शेड्युल एक्स, एच व एच १), एच व एच १ औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी या हेतूने संयुक्त कृती आराखड्यात नमूद केल्यानुसार फौजदारी प्रक्रिया १९७३चे कलम १३३ अन्वये यासंदर्भात सदरचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचे व्यवसायिकांनी तंतोतंत पालन करावे. शेड्युल एक्स, एच व एच १ औषधे व इन्हेलर विक्री करणारे औषध विक्रेते यांनी त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे. त्यांनी आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button