TOP NewsUncategorizedआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी

INS vs AUS | क्लेयर पोलोसाक (Claire Polosak) 144 वर्षांच्या इतिहासाच्या पुरुषांच्या सामन्यातील पहिल्या महिला अम्पायर

क्लेयर पोलोसाक (Claire Polosak) यांनी इतिहास रचला असून पहिल्यांदाच पुरुषांच्या टेस्ट मॅचमध्ये अम्पायरिंग करणाऱ्या त्या पहिल्या महिला पंच अधिकारी बनल्या आहेत. या सामन्यात क्लेयर पोलोसाक या चौथ्या अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.

याआधी क्लेयर पोलोसाक यांनी 2019 मध्ये नामीबिया आणि ओमानमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टूच्या सामन्यात अम्पायरिंगची संधी मिळाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणाऱ्या सिडनी कसोटी सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन ग्राउंड अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.

काय असतं चौथ्या अम्पायरचं काम?

कधी कधी मैदानात नवा चेंडू घेऊन येणं, अम्पायर्ससाठी ड्रिंक्स घेऊन जाणं, टी आणि लंच ब्रेक दरम्यान पिचची देखरेख करणं यांसारखी काम चौथ्या अम्पायरच्या देखरेखीखाली करण्यात येतात. तसेच जर कोणत्याही कारणामुळे फिल्ड अम्पायर मैदानात उपस्थित नसतील तर त्यावेळी तिसऱ्या अम्पायरला मैदानावर अम्पायरिंगसाठी जावं लागतं. अशातच चौथा अम्पायर, तिसऱ्या अम्पायरची भूमिका साकारताना दिसून येतो.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आज तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या गुणतालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीच्या गुणांवर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button