breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जतमध्ये ‘रोटी डे’ची अभिनव संकल्पना

कर्जत |

येथील दादा पाटील महाविद्यालयामधील विद्यार्थी यांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ ऐवजी ‘रोटी डे’ साजरा केला. ही अभिनव संकल्पना विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली शिंदे पाटील व प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी राबवली. कर्जत शहरातील ‘स्नेह प्रेम’ या बालगृहांमध्ये हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या वेळी प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, प्राचार्य डॉ संजय नगरकर, विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली शिंदे पाटील, ‘स्नेह प्रेम’ची प्रमुख फारुख बेग, संस्कृती शिंदे ,ओंकार ढेरे, ओंकार साबळे, हर्षद परदेशी, राकेश जाधव, अनिकेत पावणे, अभिषेक दळवी, मनोज कदम, चंद्रशेखर देशमुख, स्वप्निल गावडे, निकिता देशमुख, शर्वरी खराडे, ललिता मेहेत्रे यांच्यासह अनेक विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले म्हणाले की, आज सर्वत्र ‘व्हॅलेंटाइन डे’ तरुणाई साजरा करत असताना कर्जतमध्ये मात्र सोनाली शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आगळय़ावेगळय़ा पद्धतीने हा दिवस साजरा केला. समाजसेविका सिंधुताई सपकाळ अनाथांच्या माय होत्या. आणि त्यांची आठवण म्हणून सिंधुताई यांच्या संकल्पनेतील ‘रोटी डे’ ही लोकचळवळ व्हावी म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली शिंदे पाटील यांनी पुढाकार घेऊन कर्जत शहरातील स्नेह प्रेम या बालगृहांमध्ये हा ‘रोटी डे’ साजरा केला आहे. या उपक्रम बद्दल करावे तेवढे कौतुक कमी आहे. समाजामध्ये अशा पद्धतीचा आदर्श निर्माण करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

या वेळी बोलताना चंद्रशेखर यादव म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आज अनेक विद्यार्थी हे घरच्यांनी दिलेल्या पॉकेटमनी इतरत्र खर्च करत असताना उपस्थित विद्यार्थ्यांनी मात्र या ठिकाणी एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे. घरच्यांनी दिलेले पैसे बचत करून त्यांनी या ठिकाणी दीनदुबळे, पीडित, शोषित यांचे अश्रू पुसण्याचे काम विद्यार्थी वयात केले आहे हे निश्चितच कौतुक करण्यासारखे आहे यासाठी सोनाली शिंदे पाटील यांनी एक आदर्श  या ठिकाणी या युवा पिढीसाठी घालून दिला आहे. या वेळी प्राचार्य संजय नगरकर यांचे ही भाषण झाले. या वेळी सर्व उपस्थितांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी सोनाली शिंदे पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button