breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

रायगडामध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव; पनवेलमध्येही पाच रुग्ण आढळले

मुंबई |

अलिबाग- रायगड जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉन विषाणूने शिरकाव केला आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीत ओमायक्रोन विषाणूचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रशासनाने नागरीकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्याभरात परदेशातून ५ हजार २३६ जण दाखल झाले आहेत. त्यांची व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली होती. यात १८ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या सर्वांचे नमुने विषाणू तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेकडे पाठविण्यात आले होते. त्याच पाच जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. यात दक्षिण अफ्रीकेतून आलेल्या व्यक्तीच्या पी आणि मुलीचा तर नायजेरिया, दुबई आणि इंग्लड मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात १ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ हजार २३६ नागरीक परदेशातून दाखल झाले आहेत. यातील पनवेल येथील ३ तर माणगाव येथील १ अशा एकुण चार जणांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही करोना चाचणी करण्यात आली होती. यात १८ जण करोनाबाधीत आढळले होते. आता त्यातील पाच जणांना ओमायकॉनची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात दररोज आढळून येणारम्य़ा रुग्णांची संख्या ४० ते ४५ वर पोहोचली आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीत रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात सुरु झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी केले आहे.

  • परदेशातून रायगडमध्ये आलेल्या चौघांना करोनाची लागण

रायगड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात परदेशातून ४ हजार ८६८ जण दाखल झाले आहेत. यातील चौघांना करोनाची लागण झाली आहे. तर लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या ५ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांना ओमायक्रोनची बाधा झाली आहे अथवा नाही यासाठी नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू परिक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात १ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ४ हजार ८६८ नागरीक परदेशातून दाखल झाले आहेत. यात पनवेल महानगर पालिका हद्दीतील २ हजार ३६०, अलिबाग १६४, कर्जत ८७, खालापूर १९६, महाड ३१५, माणगाव ३८६, म्हसळा १७९, मुरुड २३०, पनवेल ग्रामिण ३४९, पेण ६२, पोलादपूर १७, रोहा ९६, श्रीवर्धन २३५, तळा २८, उरण ९६, सुधागड ६ जणांचा समावेश आहे. यातील पनवेल येथील ३ आणि माणगाव येथील १ अशा एकुण चार जणांना करोनाची लागण झाली आहे.

ओमायक्रोन विषाणूमुळे ही लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी चारही रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परिक्षण संस्थेत पाठविण्यात आले आहेत. याशिवाय ज्या नागरीकांना लसीचे दोन्ही डोस घेऊन करोनाची लागण झाली आहे. तसेच ज्यांना दुसरम्य़ांना करोनाची लागण झाली आहे, अशा ५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्यप प्राप्त झालेला नाही.    दरम्यान जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढण्यास सुरवात झाली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात दररोज आढळून येणारम्य़ा रुग्णांची संख्या ४० ते ४५ वर पोहोचली आहे. पनवेल महानगर पालिका हद्दीत रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणात सुरु झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या २६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर माने यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button