breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलचा मोठा विक्रम!

७५ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतल्या ९१ विकेट

मुंबई : भारतविरद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना लखनौ येथे पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ विकेटनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहलने चांगली कामगिरी केली. त्याने एक विकेट घेत इतिहास रचला आहे.

युझवेद्र चहलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चहलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ९१ विकेट घेतल्या आहेत. त्याने या प्रकरणात भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वरला मागे टाकले आहे.

भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये युझवेंद्र चहलने ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ९१ विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने ८७ टी-२० सामन्यात ९० विकेट घेतल्या आहेत. आर आश्विनने ६५ सामन्यात ७० विकेट घेतल्या आहेत. बुमराहने ६० सामन्यात ७० विकेट घेतल्या आहेत.

लखनऊमध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी युझवेंद्र चहलच्या नावावर ९० विकेट होत्या. काल झालेल्या सामन्यात २ षटकात ४ धावा देच १ बळी घेतला आहे. या दरम्यान त्याने एक मेडन ओव्हर देखील टाकली आहे.
चहलने आत्तापर्यंत भारतीय संघासाठी ७२ एकदिवसीय आणि ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २७.१३ च्या सरासरीने एकूण १२१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ७५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना चहलने २४.६८ च्या सरासरीने आणि ८.१४ च्या इकॉनॉमीने ९१ विकेट्स घेतल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button