breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत लवकरच १ अब्ज कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा विक्रम करणार

नवी दिल्ली – सध्या भारतात कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यातच भारत देश लसीकरणाबाबत नवनवे विक्रमही मोडीत काढत आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. कारण लवकरच देश १०० कोटी किंवा एक अब्ज लस डोस देण्याचा विक्रम करणार आहे. यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा विचार सरकार करत आहे.

पुढील आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत हे लक्ष्य साध्य केले जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय संपूर्ण भारतभर कार्यक्रमांसह हा दिवस साजरा करण्याची योजना आखत आहे. यामध्ये कोरोना योद्धा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचे नियोजन आहे, जे लसीकरण मोहिमेत सर्वात प्रमुख आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या सेलिब्रेशनवेळी कोरोना योद्ध्यांचा सन्मान कसा करावा याविषयी त्यांचे विचार मांडण्यास सांगितले आहे. या कोविड योद्ध्यांमध्ये कर्तृत्व बजावताना जीव गमावलेल्यांचाही समावेश आहे. भारत पुढील आठवड्यात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हे लक्ष्य साध्य करणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button