TOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

आशिया चषकात आज भारत अफगाणिस्तान आमने-सामने, जाणून घ्या सामन्याचे प्रत्येक अपडेट

आशिया चषक स्पर्धेत सध्या सुपर-४ फेरीतील सामने सुरू आहेत. यूएईमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावल्यामुळे अफगाणिस्तान बरोबरच भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आजचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळवला जाणार आहे. असे असले तरी आपली कामगिरी सुधारण्यासाठी तसेच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

भारत आशिया चषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही. आपल्या सालामीच्या लढतीत भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. तर सुपर चार फेरीमध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील सलग दोन सामने गमावले. याच कारणामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र सुपर-४ फेरीमध्ये आज भारताचा अफगाणिस्तानविरोधात सामना आहे. अफगाणिस्तान संघाचे आव्हानदेखील संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे आजचा सामना तसा औपचारिकतेपुरता खेळला जाणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button