क्रिडाताज्या घडामोडीपुणे

भारताने केला न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव

पुणे |आधी भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटत असतानाच बघताबघता चार गडी बाद झाल्याने सामना शेवटच्या षटकापर्यत पोहचला आणि विजयमाला कोणाच्या गळ्यात हार घालेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ऋषभ पंतने समयसूचकता दाखवत विजयी चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून देताना तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडीही मिळवून दिल.नवा गडी नवे राज्य या म्हणीच्या धर्तीवर टी-20 वर्ल्डकप मधील अपयश विसरून भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या आजच्या या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंड(त्यांचा मुख्य कर्णधार केन विलीएम्सन दुखापतीमुळे बाहेर आहे, त्याच्या जागी टीम साऊथदी नेतृत्व करत आहे) विरुद्धच्या मायदेशातल्या मालिकेला आज विजयी सुरुवात करताना किवी संघाला सहा गडी राखुन पराभूत केले.आजच्या पहिल्या सामन्यात भरताना वेंकटेश अय्यरला पदार्पणाची, तर चहर, अक्षर पटेल, भुवनेश्वर, सिराज, श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडुना पुनरागमन करण्याची संधी दिली. आज रोहितने नाणेफेक जिंकून सुरुवातही चांगली केली,(कोहलीचे आणि टॉसचे पण सध्या त्याच्या फॉर्म सारखे हाडवैर असल्याने, आपल्याला नाणेफेक जिंकायचे सुख मिळतच नव्हते) आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वरने स्वप्नवत सुरुवात करताना आज सलामीला खेळणाऱ्या मिचेलच्या चिपळ्या उडवून भारतीय संघाला चांगली सुरुवातही करून दिली.न्यूझीलंड संघात आज डावखुऱ्या चॅपमनला स्थान देण्यात आले, तो मिचेल बाद झाल्यानंतर खेळायला आला, आणि त्याने मिळालेल्या संधीचे सोने कसे करतात याचे सुंदर प्रात्यक्षिक देत आपली अर्धशतकी खेळी पूर्ण करून संघाला सुस्थितीतही आणले.

हे त्याचे दुसरे 20/20मधले अर्धशतक ठरले जे केवळ 45 चेंडूत आले, त्यात दोन षटकार आणि पाच चौकार सामील होते. साहजिकच यामुळे किवी संघाचा डाव सावरला गेला, यादरम्यान भारतीय गोलंदाजांनीही स्वैर गोलंदाजी केली, सिराज, अक्षर चहर यांचे षटके महागडी ठरली.

यामुळे रोहितवर नाही म्हटले तरी दडपण आले होते.ही जोडीने शतकी भागीदारी नोंदवत रोहीतच्या तोंडचे पाणी पळवले होते, पण अशा कठीण प्रसंगातच त्याच्यातला धुर्त कर्णधार जागा होता,त्याने अश्विनच्या हातात चेंडु दिला,आणि अनुभवी अश्विनने 14 व्या षटकात दोन बळी घेत कर्णधाराला दिलासा देत भारतीय संघाला सामन्यात परत आणले.

आधी त्याने चॅपमनला 60 धावांवर त्रिफळाबाद केले,तर आणखी दोन चेंडूनंतर ग्लेन फिलिप्सला पायचीत करत किवी संघाची अवस्था एक बाद 110 वरून तीन बाद 110 अशी केली.टी -20 क्रिकेटची खरी गंमत हीच असते हे वारंवार सिद्ध झाले आहे की एक खराब अथवा एक चांगले षटक सामन्याचा निकाल बदलवू शकते.

दुसऱ्या बाजूने मार्टिन गुप्टील मात्र जबाबदारीने खेळत होता,तीन हजाराहुन अधिक धावा या फॉरमॅट मध्ये काढणाऱ्या या आक्रमक फलंदाजाने आजच्या फॉर्मचा योग्य फायदा उठवत आपली 19 वी अर्धशतकी खेळी पूर्ण केली.त्याची ही एक वेगवान अर्धशतकी खेळी ठरली, त्यानंतर त्याची बॅट जास्तच तळपायला लागली होती, अखेर दीपक चहरच्या गोलंदाजीवर एक उंच फटका मारण्याच्या नादात तो श्रेयस अय्यरच्या हातात झेल देऊन बाद झाला.

पण त्याने आपला रोल एकदम व्यवस्थित पार पाडताना केवळ 42 चेंडूत चार उत्तुंग षटकार आणि तीन चौकार मारत 70 महत्वपूर्ण धावा काढल्या. ज्यामुळे किवी संघ एकदम सुस्थितीत आलेला होता.मात्र शेवटच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केल्याने निर्धारित वीस षटकात न्यूझीलंड संघाचा डाव 164 वर थांबला, हा एकप्रकारे भारतीय गोलंदाजीचा विजयच होता,कारण एकावेळी किवी 200च्या आसपास जाईल असे वाटत असतानाच हा चमत्कार घडला.

विजयासाठी 165 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने सुरुवात अतिशय चांगली केली, रोहीत आणि राहुल दोघेही उत्तम खेळत होते,या दोघांनी पहिल्या गड्यासाठी पन्नास धावांची मोठी आणि आश्वासक भागीदारी करत पहीलेच पाऊल जोरदार टाकलेच होते की के एल राहुल चौदा चेंडूत 15 धावा काढून सॅटनरच्या गोलंदाजीवर बाद झाला.

त्याच्या जागी आलेल्या युवा पण प्रतिभावंत सुर्यकुमार यादवने कर्णधार रोहीतच्या साथीने डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 59धावांची महत्वपूर्ण भागीदारी करताना भारतीय डावाला स्थैर्य दिले. दोघेही उत्तम खेळत आहेत असे वाटत असतानाच कर्णधार टीम साउदीने चेंडु आपल्या सर्वात यशस्वी गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या हाती दिला, आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर जम बसलेल्या रोहीतला रवींद्रनच्या हातात झेल द्यायला लावून 48 धावांवर बाद करून भारतीय संघाला दुसरा धक्का दिला खरा पण याने युवा सुर्यकुमार यादवला जराही धक्का बसला नाही.

त्याने केवळ 35 चेंडूतच आपले या प्रकारच्या क्रिकेटमधले तिसरे अर्धशतक पूर्ण केले.कर्णधार रोहीतच्या जागी आला तो ऋषभ पंत. त्याने आपल्या अंदाजात खेळताना भारतीय संघाला विजयापथावर आणले आहे असे वाटत असतानाच ट्रेंट बोल्टने सुर्यकुमार यादवला 62 धावांवर त्रिफळाबाद केले.

सुर्यकुमार यादवने जबरदस्त खेळताना केवळ 40 चेंडूत या धावा ठोकल्या ज्यामधे सहा चौकार आणि तीन षटकार होते. अर्थात तो बाद झाला असला तरी त्याने संघाला विजयाच्या अगदी समीप आणून सोडले होते.आता भारत सहज विजय मिळवेल असे वाटत असतानाच अचानक सामना रंगतदार झाला आणि रोमहर्षक ही.सुर्यकुमार पाठोपाठ श्रेयस ही धडपडत खेळत असताना बाद झाला सामन्यात रंगत निर्माण झाली.

ज्यामुळे हंगामी कर्णधार टीम साउदी गडबडला आणि त्याने चेंडू मिचेलच्या हातात शेवटच्या षटकासाठी दिला,त्याने नवोदित वेंकटेश अय्यरला बाद करून एकच खळबळ उडवून दिली खरी,पण ऋषभ पंतने जराही विचलित न होता मिडऑफच्या डोक्यावरून खणखणीत चौकार मारत भारतीय संघाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button