breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Ind vs Nz, 2nd Test: अजाजच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले, मयांकच्या शतकानं डाव सावरला

भारत आणि न्यूझीलंड  यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. दिवसाची सुरुवात भारतीय संघाने चांगली केली. सलामीवीरांनी तब्बल 80 धावांची भागिदारी केली. पण सलामीवीर शुभमन गिल 44 धावा करुन बाद होताच एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतू लागले. केवळ मयांकने  टिकून राहत शतक झळकावल्यामुळे भारताने किमान 200 धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा फिरकीपटू अजाज पटेलनेचमकदार कामगिरी करत 4 विकेट खिशात घातल्या आहेत.

सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडत केली. ज्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण संघ 80 धावांवर पोहोचताच शुभमन 44 धावा करुन बाद झाला. अजाज पटेलच्या चेंडूवर रॉस टेलरने त्याची झेल घेतली. त्यानंतर काही चेंडूनंतरच पुजारालाही अजाजने त्रिफळाचीत केलं. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराटलाही अजाजने पायचीत करत 80 धावांवरच भारताचे तीन महत्त्वाचे गडी तंबूत धाडले. त्यानंतर काही काळ श्रेयस अय्यर आणि मयांकने संघाचा डाव सांभाळला. पण 18 धावा करुन श्रेयस अजाजच्या चेंडूवर टॉम ब्लंडलच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे भारताचे महत्त्वाते 4 ही फलंदाज तंबूत परतले. पण मयांकने मात्र टिकून राहत फलंदाजी केली. रिद्धिमान साहाने त्याला साथ देत दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. ज्यामुळे दिवस अखेर भारताने 4 विकेट्सच्या बदल्यात 221 धावा केल्या आहेत. मयांक 120 आणि साहा 25 धावांवर खेळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button