breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यभरात वर्धक मात्रेचे लसीकरण सुरू; राज्यात पहिल्या दिवशी ४७,८६८ जणांना वर्धक मात्रा

मुंबई |

राज्यात आरोग्य, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा देण्यास सोमवारपासून सुरूवात झाली़ पहिल्या दिवशी ४७ हजार ८६८ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली. दुसऱ्या मात्रेनंतर नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्ती वर्धक मात्रेसाठी पात्र असणार आहेत. राज्यभरात सुमारे २९ लाख ९ हजार ६०० ज्येष्ठ नागरिक या मात्रेसाठी पात्र आहेत. लसीकरणासाठी स्वतंत्र नोंदणी करण्याची आवश्यकता नसून, आधीच्या मोबाईल क्रमांकावर लस घेता येणार आहे. राज्यभरात संध्याकाळी साडेपाचपर्यत ४७ हजार ८६८ जणांनी लशीची वर्धक मात्रा दिली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींच्या वर्धक मात्रा देण्यात येत असून, स्पुटनिक लस घेतलेल्यांबाबत अजून निर्णय झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले. आधी जी लस घेतली आहे त्याच लशीची वर्धक मात्रा दिला जाणार असल्याचेही यात म्हटले आहे.

  • मुंबईत चांगला प्रतिसाद…

मुंबईत सोमवारी अनेक केंद्रांवर वर्धक मात्रा घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. पहिल्याच दिवशी आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीही केंद्रावर गर्दी झाली होती. सकाळपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी दीर्घकालीन आजार असलेले ज्येष्ठ नागरिक वर्धक मात्रा घेण्यासाठी आले होते. दिवसभरात नागरिकांचा ओघ सुरूच होता. पहिल्याच दिवशी लसीकरण मोहिमेतील या टप्प्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती केईएम रुग्णालयातील सामाजिक औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजानन व्हेल्हाळ यांनी दिली.  तिसरी लाट सुरू झाल्यामुळे लसीकरणाच्या रांगेत उभे राहण्याची भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया काही ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली, तर काही नागरिकांनी तिसऱ्या लाटेमध्ये आजारी पडू नये या काळजीने लस घेण्यास आल्याचे सांगितले.  केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद चांगला होता. दिवसभरात ३०० हून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले, तर अत्यावश्यक आणि आरोग्य सेवेतील सुमारे १९० कर्मचाऱ्यांनी लस घेतली, असे वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत करोनाची बाधा झालेल्यांनी तीन महिन्यानंतर वर्धक मात्रा घ्यावी, असे आरोग्य विभागाने सूचित केले आहे.

  • ५-१० टक्के करोनाग्रस्तांना रुग्णालयात उपचारांची गरज

नवी दिल्ली : करोनाच्या तिसऱ्या लाटेत आतापर्यंत ५-१० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आह़े हे प्रमाण दुसऱ्या लाटेमध्ये २०-२३ टक्के होते. रुग्णालयातील उपचाराधीन रुग्णांची संख्या तुलनेत कमी असली तरी, अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉन तसेच डेल्टाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारांनी सतर्क राहावे, असा इशारा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सोमवारी सर्व राज्यांना पत्राद्वारे दिला. -सविस्तर पान ५

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button