breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ; 11 महिन्यांत 4000 गुन्ह्यांची नोंद

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील 11 महिन्यांमध्ये मुंबईत सायबरचे 3 हजार 960 गुन्हे दाखल केल्याची महिती समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील 11 महिन्यांमध्ये मुंबईत सायबरचे 3 हजार 960 गुन्हे दाखल केल्याची महिती समोर येत आहे. कस्टमचे 66, खरेदीचे 154, विमा पंपनी आणि पीएफचे 16 गुन्हे दाखल असून दोन गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक गुन्हे पश्चिम उपनगरांत झाले आहेत. क्रेडिट कार्ड, वीज बिल, लोनच्या नावाखाली आणि सेक्सटॉर्शन करून नागरिकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे समजते. सध्याच्या डीजीटल युगात सायबर ठग हे इंटरनेटचा वापर करून नागरिकांची फसवणूक करत आहेत. सायबर ठग हे सर्वाधिक टार्गेट नोकरदार आणि बेरोजगार यांना करतात. सध्या एनी डेस्क अॅप्सचा वापर नोकरीच्या नावाखाली, लोन आणि वीज बिलाच्या नावाखाली फसवणुकीचे गुन्हे मुंबईत घडत आहेत.

दरम्यान, ऑनलाइन गुन्हे रोखण्यासाठी पोलीस सातत्याने जनजागृती करत असतात. मात्र तरीही सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांन बऱ्याच जणांवर याप्रकरणी कारवाया केल्या आहेत. त्यानुसार, बनावट वेबसाईटचे 47 गुन्हे दाखल असून पोलिसांनी 3 गुह्यांची उकल करून चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याचे 24 गुन्हे असून त्यात 4 जणांना जेरबंद केले आहे. तसेच सध्या क्रिप्टो चलनाच्या नावाखालीदेखील नागरिकांची फसवणूक केली जाते. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा देऊ अशा भूलथापा मारतात. क्रिप्टो करन्सी फसवणुकीचे मुंबईत 16 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तीन गुह्यांची उकल करून पाच जणांना अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button