breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशभरात चिनी कंपन्यांवर आयकर छापे; शाओमी, वनप्लस आणि ओप्पो टार्गेट

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
सध्या भारतातील मोबाईल क्षेत्रात चिनी कंपन्यांचं अधिराज्य आहे. मात्र अशातच आयकर विभागाने केलेल्या एका कारवाईने चिनी कंपन्यांची धाकधूक वाढवली आहे. आयकर विभागाने काल, बुधवारी देशभरातील चिनी मोबाईल कंपन्या शाओमी, वनप्लस आणि ओप्पो या ठिकाणांवर आणि संबंधित संस्थांवर छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये चिनी मोबाईल कंपन्यांशी संबंधित संस्थांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप आहेत.

शाओमी, वनप्लस आणि ओप्पोसाठी दिल्ली-एनसीआर, कर्नाटकसह १५ ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. शोधमोहीम गुप्त मिळकत आणि करचोरी यासंबंधी गुप्तचर माहितीवर आधारित आहे. दरम्यान, नेपाळ आणि अमेरिकेतही या कंपन्याविरोधात कारवाई केली जात आहे.

वितरण भागीदार, कॉर्पोरेट कार्यालये, गोदामे आणि चिनी मोबाईल कंपन्यांच्या निर्मात्यांच्या ठिकाणांवर अजूनही छापे टाकले जात आहेत. याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. यावर्षी ऑगस्टमध्ये चिनी टेलिकॉम उपकरणे बनवणाऱ्या झीटीईच्या तळांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी आयकर विभागालाही करचुकवेगिरीची माहिती मिळाली. याशिवाय मोबाईल फोन व्यवसाय, कर्ज अर्ज आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित एका चिनी कंपनीवरही नुकतेच छापे टाकण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांनी हा छापा टाकला. सकाळी ग्रेटर नोएडामध्ये ओप्पोचे कार्यालय उघडल्यानंतर थोड्याच वेळात अकराच्या सुमारास इन्कम टॅक्स टीम पोहोचली. कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी सध्या कोणालाही कार्यालयातून बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टीम कागदपत्रांची छाननी करत आहे. सूत्रांनी सांगितले की, ओप्पो कंपनी करचुकवेगिरी करत स्थानिक लोकांना रोजगार देत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेनेदेखील चीनच्या तब्बल १३ कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. तसेच नेपाळनेही तशीच कृती केली आहे. भारतात ९२ चिनी कंपन्यांची नोंदणी झाली असून ८० कंपन्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button