breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधानांच्या हस्ते ५ फेब्रुवारीला ‘स्टॅच्यू ऑफ इक्विटी’चे उद्घाटन

 

हैदराबाद | टीम ऑनलाइन
तेलंगणात ४५ एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्विटी’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. ११ व्या शतकातील संत रामानुज आचार्य यांचा २१६ फूट उंच बैठकीच्या मुद्रेतील पुतळा आहे. तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुतळा आहे. १३ फेब्रुवारीला पुतळ्याच्या अंतर्गत १२० किलो सुवर्णजडीत खोलीचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते केले जाणार आहे.

स्टॅच्यू ऑफ इक्विटीच्या उद्घाटनासाठी १०३५ यज्ञांचे आयोजन करण्यात आले आहे. २ फेब्रुवारीपासून हा सोहळा सुरू होणार आहे. त्याला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, अभिनेते, उद्योगपती आदी उपस्थित राहणार आहेत. ५ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी त्याचे उद्घाटन करतील, असे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button