breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ च्या वतीने गांधीभवन मैदानावरील खादी प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष सचिव अन्वर राजन यांच्या हस्ते ६ जानेवारी रोजी ११ वाजता करण्यात आले. खादी कापड प्रदर्शन व विक्री १५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अरुणा तिवारी, नितीन मेहता, राजेंद्र बहाळकर, दीपाली पाटील, अॅड. संतोष म्हस्के, अभय देशपांडे उपस्थित होते. किशोर फुलंबरकर यांनी स्वागत केले.

अन्वर राजन म्हणाले खादी हे गांधी विचार, देशप्रेम याचे प्रतीक आहे.पर्यावरणपूरक आहे, ग्रामीण भागात रोजगाराचे साधन आहे, त्यामुळे खादीचा प्रसार केला पाहिजे. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ ही संस्था १९६९ पासून खादी प्रसारासाठी कार्यरत आहे.गावोगावी खादी प्रदर्शन भरवली जातात, असं किशोर फुलंबरकर यांनी सांगीतले.

विविध प्रांतातील वेगवेगळ्या दर्जाच्या शुद्ध खादी वस्त्रे, तयार कपडे उपलब्ध करण्यात आली आहेत. नव-नवीन डिझाईनचे शर्ट, गांधी टी- शर्ट, कुर्ता, पायजामा, जॉकेट आहेत. लुंगी, टॉवेल, शर्टिंग व कोटिंग उपलब्ध आहे.साड्यांमध्ये खादी साडी, कोसा साडी प्रदर्शनात आहे. ड्रेस मटेरियल, लेडिज टॉप, रुमाल, बेडशीट, खेस चादरी, स्प्रे-दरी, उलन शॉल, कोसा शॉल व लेडीज बॅग यांचा समावेश या प्रदर्शनात आहे. सुती खादी वर २० टक्के सूट तर कोसा कापड वर १५ टक्के सूट जाहीर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ७८७५०८६४१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button