breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये जिजाऊ उद्यानामधील ‘जिजाऊ सृष्टी’चे महापौर माई ढोरेच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी – राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनातून, देशावरील प्रेमातून छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. अशा थोर राजमाता जिजाऊंच्या या नवीन सृष्टीतून भावी पिढीला देशभक्तीची सतत प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ चिंचवड येथील राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र उद्यानामधील ” जिजाऊ सृष्टीचे ” तसेच शहरातील विविध क्षेत्रातील कलाकार बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या ” आपले चिंचवड व्यासपीठचे ” लोकार्पण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, स्वीकृत नगरसेवक अॅड.मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, माजी नगरसदस्या उमा खापरे, थोर इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्ज्वला गावडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचवडे, महेश कुलकर्णी, मिलिंद देशपांडे, हेमंत हरहरे, माजी मनापा अधिकारी सुभाष माछरे तसेच शहरातील विविध कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व कलाकार मंडळी उपस्थित होती.

राजमाता जिजाऊ सृष्टीत इतिहासातील ज्या शिवघराण्यातील महिलांचे योगदान आहे, त्यांची महती व माहिती दर्शवणारे म्युरल्स उभारण्यात आले आहे. अटक ते कटक स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे राजे शहाजी भोसले यांच्या पत्नी जिजाऊ माँसाहेब तसेच घराण्यातील सईबाई राणीसाहेब, राणी येसुबाई, राणी ताराबाई, तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाने पेशवेकाळात अटक ते कटक मराठा साम्राज्य उभे राहिले यांची महती म्युरल्सव्दारे जिजाऊ सृष्टीत साकारलेली आहे.

यासाठी तसेच योगासन, व्यायाम प्रतिकृती, आणि जॉगिंग ट्रक यासाठी एकूण ७४ लाख ९९ हजार इतका खर्च आलेला आहे.
या कामाची संकल्पना नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी मांडली व याकामास प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक राजेंद्र गावडे, अपर्णा डोके यांनी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button