चोवीस तासांत 12,516 नवे कोरोना रुग्ण, 13,155 जणांना डिस्चार्ज
पुणे | भारतात गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 516 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 13 हजार 155 बरे कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 37 हजार 416 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही 267 दिवसांतील नीचांकी ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 14 हजार 186 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 38 लाख 14 हजार 080 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.26 टक्के एवढा झाला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 501 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 62 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे.आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 62 कोटी 10 लाख 67 हजार 350 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 11 लाख 65 हजार 286 नमूने तपासण्यात आले आहेत.कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 110.79 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.