पिंपरी / चिंचवड

पहाटेच्या वेळी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तरुणाला मारहाण करून लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

पहाटेच्या वेळी रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून मारहाण केली आणि तरुणाकडील ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे तीन वाजता ग्रीव्हज कंपनी समोर काळभोर नगर येथे घडली.

करण सुनील शिर्के (वय 24, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चिंचवड रेल्वे स्टेशन येथून त्यांच्या घरी रुपीनगर येथे जात होते. ते जुन्या पुणे मुंबई महामार्गाने चालत जात होते. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ते काळभोर नगर येथील ग्रीव्हज कंपनी समोर आले असता दोन दुचाकींवरून चार अनोळखी चोरटे आले. त्यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी यांच्याकडील मोबाईल फोन अंडी स्मार्ट बँड असा एकूण 6700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button