breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा राज्य सरकारला घरचा आहेर!

  • महावितरण विरोधात ‘कंदिल मोर्चा’; शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

पिंपरी | विशेष प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवडमधील महाविकास राज्यात महाविकास आघाडीने राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात सत्ता असतानाही शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित गव्हाणे यांनी महावितरण विरोधात कंदील मोर्चा काढून धुरळा उडवून दिला आहे.

मोशी- चिखली परिसरात सतत लाईट वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ‘कंदिल मोर्चा’ आयोजित केला होता. सत्तेत असताना पदाधकारी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोशी चिखली परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे येथील उद्योजक, नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगत महाविकास आघाडी मधील पदाधिकार्यांनी रिव्हर रेसिडेन्सी मोशी येथील महावितरणच्या कार्यालयावर कंदील मोर्चाचे आयोजन केले होते, असे सांगण्यात येत आहे.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकारण म्हणून या प्रश्नाचे राजकीय भांडवल केले जात आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

शिवसेने काँग्रेसला डिवचले…

पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत काँग्रेसचे नेते आहेत. काँगेस मंत्र्यांच्या नियंत्रणात असलेल्या महावितरण विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय आल्हाट यांच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी झाडून या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसला डिवचण्यापेक्षा शिवसेनेने संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवणे अपेक्षित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button