breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

एका वर्षात भाजपाने प्रचारासाठी खर्च केले तब्बल कोट्यवधी रुपये; रक्कम कळल्यावर धक्काच बसेल…

नवी दिल्ली |

आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगलाच पैसा खर्च केला आहे जवळपास 60 टक्के तृणमूल काँग्रेस शासित राज्यात प्रचारासाठी वापरले. भाजपाने याबद्दलचं विवरण निवडणूक पॅनेलकडे सादर केलं आहे. त्यावरुन या रकमेबद्दल माहिती मिळत आहे. निवडणूक पॅनेलला सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या विवरणानुसार, भाजपाने निवडणूक प्रचारासाठी २५२ कोटी रुपये खर्च केले. खर्च केलेल्या २५२ कोटी २ लाख ७१ हजार ७५३ रुपयांपैकी ४३.८१ कोटी आसाम निवडणुकीसाठी आणि ४ कोटी ७९ लाख रुपये पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी होते.

तामिळनाडूमध्ये, जिथे द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) ने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी AIADMK कडून सत्ता हिसकावून घेतली, तिथे फक्त २.६ टक्के मते मिळविणाऱ्या भाजपाने प्रचारात २२ कोटी ९७ लाख रुपये खर्च केले. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार केला. त्यांनी राज्यात १५१ कोटी खर्च केले. केरळमध्ये, जेथे विद्यमान एलडीएफने सत्ता कायम ठेवली, तेथे भाजपने २९ कोटी २४ लाख खर्च केले. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली निवडणूक खर्चाची विवरणपत्रे निवडणूक आयोगाने आता सार्वजनिक केली आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button