breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 973, पुण्यात 349 नवे कोरोनाबाधित, राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांहून खाली

मुंबई – शुक्रवारी 14 हजार 152 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर 20 हजार 852 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच, 289 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,96,894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,07,058 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत

मुंबईतील आकडाही गेल्या काही दिवसांपासून एक हजारांच्या देखील येत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 973 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1207 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,76,400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,347 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 515 दिवसांवर पोहोचला आहे.

धारावीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद

आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 20 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत आजवर एकूण 6830 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9476 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9812 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

पुणे शहरात 349 नवीन रुग्णांची नोंद

पुणे शहरात आज नव्याने 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 71 हजार 577 इतकी झाली आहे. शहरातील 699 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 58 हजार 374 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 872 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 26 हजार 221 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 4 हजार 842 रुग्णांपैकी 721 रुग्ण गंभीर तर 1372 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 21 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 361 इतकी झाली आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button