ताज्या घडामोडीमुंबई

अवघ्या ५ दिवसांत सोने ३.५ हजार रुपयांनी स्वस्त

मुंबई  | रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता प्रयत्न सुरू झाल्यामुळे अवघ्या ५ दिवसांत सोन्याच्या दरात ३ हजार ५०० रुपयांची घसरण झाली. कमॉडिटी वायदे बाजारात आज सोन्याच्या दरात ६३९, तर चांदीच्या दरात ८१३ रुपयांची घसरण झाली होती.

एमसीएक्समध्ये सोन्याच्या वायदे बाजारातील दरात आज सकाळी ०.६ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सोन्याचा दर ५१ हजार ९९९ रुपयांवर खुला झाला. चांदीच्या दरात ०.५५ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ६८ हजार ४७० रुपयांवर खुली झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात आलेल्या तेजीमुळे तोळ्याचा भाव ५५ हजार ६०० रुपयांवर गेला होता. ५ दिवसांत त्यात सुमारे ३ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. एमसीएक्स वायदे बाजारात ५ एप्रिलचा सोन्याचा दर ५१ हजार ६६५ रुपये तोळा होता. त्यात ६३९ रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात ८१३ रुपयांची घसरण झाल्यामुळे वायदे बाजारातील दर ६८ हजार ३१ रुपये किलो होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button