breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

दादरच्या लॅबमध्ये १२ जणांना कोरोना, मुंबईत ६८३ नवे रुग्ण

मुंबई – कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. शुक्रवारी मुंबईत ६८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दादर पश्चिमेतील लाल पॅथ लॅबमधील १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या घटनेनंतर महापालिकेने ही पॅथोलॉजी लॅब सील केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लॅबमध्ये काम करणाऱ्या नारायण विजय राणे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्या ३९ जणांचा शोध सुरू केला. लॅबमधील इतर कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता १९ पैकी १२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांना आपापली काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, काल दिवसभरात मुंबईत २६७ कोरोना रुग्णांना बरं वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला. यासह मुंबईत एकूण ७ लाख ४७ हजार २५८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या ३ हजार २२७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या ११ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईतील ओमायक्रॉनबाधितांचा आकडा आता ४६ वर पोहोचला आहे. त्यापैकी १९ जणांना बरं वाटल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असेल. या काळात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. याशिवाय लग्न समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहे. क्षमतेच्या ५०% जास्त लोकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button