पिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये दोघांचे मोबाईल फोन हिसकावले

पिंपरी l प्रतिनिधी

चिंचवड येथे एका व्यक्तीला फोन करण्याच्या बहाण्याने थांबवून  त्याचा मोबाईल फोन पळवला. तर पायी चालत जाणा-या एका व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. या दोन्ही घटना शुक्रवारी (दि. 8) रात्री दहा वाजताच्या सुमारास काळभोरनगर आणि शिवाजी चौक चिंचवड स्टेशन जवळ येथे घडल्या.

विशाल बाळू कालेकर (वय 32, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी चोरटे त्यांच्या जवळ आले. फोन लावण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी बोलत त्यांच्या हातातील 18 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेला. त्यानंतर चिंचवड स्टेशन चौकात लक्ष्मण वैजनाथ तुकदे (रा. टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांचा 12 हजारांचा मोबाईल फोन त्याच चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button