breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड येथे जुन्या भांडणाच्या रागातून लावली घराला आग

पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून घर नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुळजाभवानी मंदिराजवळ, महात्मा फुले नगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 03) पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकरणी किरण बाळु वाघ (वय 27, रा. तुळजाभवानी मंदिराजवळ, महात्मा फुले नगर, चिंचवड ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धेश शंकर राजगुरू (वय 22, रा. रुपी नगर, निगडी) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 436, 450 व 427 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या घरात घुसला. घर नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने घराला आग लावली. या आगीत घरातील 26 हजार 500 रुपयांच्या वस्तूंचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत‌.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button