Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहार जिल्ह्यात दिवसाढवळ्या विद्यार्थिनीवर गोळी झाडल्याची घटना समोर

बिहारः बिहार जिल्ह्यात दिवसाढवळ्या विद्यार्थिनीवर गोळी झाडल्याची घटना समोर येत आहे. काजल असं जखमी विद्यार्थिनीचं नाव असून ती कोचिंग क्लासमधून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोराने तिच्यावर पाठीमागून गोळी झाडली. काजलची प्रकृती नाजूक असून तिच्या घशात गोळी अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

काजल बेउर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिपारा परिसरात येथे असलेल्या कोचिंग क्लासमधून घरी परतत होती. त्यावेळी तिच्या रोजच्या मार्गावर आधीपासून हल्लेखोर दबा धरुन बसला होता. काजल समोरुन येताना दिसताच त्याने तिच्यावर गोळी झाडली. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तसंच, गोळी काजलच्या घशात अडकल्याने तिची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जातंय.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. मात्र, अद्याप त्याला पकडण्यात यश आले नाहीये. ही घटना घडल्यानंतर पोलिस खूप वेळानंतर पोहचले आहेत. तसंच, फोनवरुन पीडितेच्या कुटुंबीयांसोबत माहिती मिळवत आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, पोलिस घटनास्थळी उशीरा पोहोचल्यामुळं कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

सीसीटीव्हीत काय आहे?
पटनातील सिपारा परिसरात एक युवकाने अल्पवयीन तरुणीवर दिवसाढवळ्या गोळी झाडल्याच्या घटनेने सगळेच हादरले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. एका मुलगा हातात पिशवी घेऊन येताना दिसत आहे. त्याच बरोबर गल्लीच्या कोपऱ्यावर आल्यावर तो थांबताना दिसत आहे. त्याच्यामागोमाग विद्यार्थिनी येत आहे. तो तिला अडवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, विद्यार्थिनीनी त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुढे जाताना दिसत आहे. इतक्यात आरोपी हातातील पिशवीतून हत्यार काढून तरुणीच्या पाठीमागून गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर तरुणी तिथेच जखमीवस्थेत कोसळली. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाजाने आजूबाजूचे रहिवासी धावत आहे आणि विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केली. मात्र, तिची ती गंभीर जखमी झाल्याने चिंता वाढली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button