breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

औरंगाबादेत १०० जणांच्या तपासणीत ४९ लोकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

 

औरंगाबाद | प्रतिनिधी 
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या स्फोटक बनत चालली आहे. तर औरंगाबाद शहरात रविवारी दिवसभरात तब्बल ७७९ रुग्ण आढळून आले असून पॉझिटिव्हिटी रेट ४८.२७ वर पोहचला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा सध्या कितीतरी पटीने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. औरंगाबाद मनपा हद्दीत १०० लोकांच्या तपासणीनंतर तब्बल ४९ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत.

रविवारी दिवसभरात १,६१८ जणांची कोरोना चाचणी केली असता त्यातील ७७९ जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी दिवसभरात एकूण १,२२४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात मनपा हद्दीत ७७९ रुग्णांचा समावेश असून ग्रामीण भागातील ४४५ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ५६७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून ७,०५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button